चॉंदशाहवली बाबाचे हर्षवर्धन पाटलांनी घेतले दर्शन

रेडा- इंदापूर शहरातील हिंदू-मुस्लीम ऐक्‍याचे प्रतीक असलेल्या हजरत चॉंदशाहवली बाबांचा उरूस सध्या जुन्या तहसील कचेरी येथे असलेल्या दर्गाहामध्ये सुरू आहे. माजी संसदीय व सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी चॉंदशाहवली बाबांचे दर्शन घेऊन फुलांची चादर चढवली. उरुसाला सुरुवात झाली आहे. याप्रसंगी पाटील सहभागी झाले.

संध्याकाळी बाबांच्या झेंड्याची ग्राम प्रदक्षिणा होऊन उरुसाची समाप्ती होणार आहे. धार्मिक व सामाजिक सलोख्याचे प्रतीबिंब असणाऱ्या या उरुसाला अधिक महत्त्व आहे. ही परंपरा पुढे कायमस्वरूपी चालू राहण्यासाठी सर्वांचा मनापासूनचा सहभाग असावा, असे मत पाटील यांनी व्यक्‍त केले. यावेळी माजी नगराध्यक्ष अशोक इजगुडे, नगरसेवक कैलास कदम, जगदीश मोहिते, इब्राहिम शेख, गुड्डू मोमीन, आझाद पठाण, मौलाना मुशाहिदी, मुन्नाभाई मुजावर, महादेव चव्हाण, एकनाथ जाधव, रघुनाथ राऊत, हमीद आत्तार उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.