पिंपरी, (प्रतिनिधी) – इंडियन फार्मासिटिकल असोसिएशन आयपीए पुणे शाखेने राष्ट्रीय फार्मसी सप्ताह अंतर्गत घेतलेल्या विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळा नुकताच आकुर्डी येथील डॉ. डी वाय पाटील फार्मसी महाविद्यालया मध्ये पार पाडला.
यावेळी महाविद्यालयाचे विद्यार्थी मनमोहन सिंग आणि मारुफ शिकलगर यांनी मॉडेल मेकिंग स्पर्धेत प्रथम पारितोषिक आणि यश भारद्वाज आणि संकेत पालवे आयडियाथॉन यांनी द्वितीय पारितोषिक पटकावले. गौरांग दुसाने, अनंत ढवळे, ईश्वर क्षीरसागर, कांचन वंजारी, श्रेया बोऱ्हाडे यांनी फार्मा ॲड मॅड स्पर्धेत द्वितीय पारितोषिक पटकावले.
विजेत्यांना आयपीएचे राष्ट्रीय अध्यक्ष टी. व्ही नारायणा व डॉ. के. आर. महाडिक यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. मुलांच्या नाविन्यपूर्ण बौद्धिक क्षमतेवर आधारित या तीन स्पर्धांमध्ये प्रथम आणि द्वितीय पारितोषिक मिळाल्यामुळे त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नीरज व्यवहारे यांनी व्यक्त केले. यावेळी आयपी पुणेचे सचिव डॉ. साथियानारायण अरुण गांधी, डॉ. अविनाश भोंडवे यांनी महाविद्यालयाची उत्कृष्ट पायाभूत सुविधांचे कौतुक केले.