पुणे,{प्रभात वृत्तसेवा}- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनकार्य आपल्यासाठी प्रेरणादायी आहे.त्यांनी आपल्या जीवाचे रान करून सर्व समाजाला समतेचा मान दिला. म्हणूनच त्यांच्या कार्याप्रती आपण विनम्र होतो, लीन होतो. असे प्रतिपादन महायुतीचे शिरुर लोकसभेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पुण्यात केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आढळराव यांनी त्यांना अभिवादन केले. हडपसर विधानसभेचे आमदार चेतन तुपे, विधानसभा अध्यक्ष डॉ. शंतनू जगदाळे, कार्याध्यक्ष अमर तुपे, उपाध्यक्ष अजिनाथ भोईटे तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
कोंढवा-कात्रज भागात प्रतिसाद…
हडपसर विधानसभा मतदार संघाअंतर्गत समाविष्ट असलेल्या विविध भागात आढळराव यांनी मतदारांच्या भेटी घेतल्या. कोंढवा बुद्रुक प्रभाग क्रमांक 41 मधील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिराला भेट देऊन त्यांनी काळभैरवनाथाचे दर्शन घेतले. त्यानंतर स्पायकर शुगरचे सचिव शिवाजीकामटे यांच्या निवासस्थानी भेट दिली.
नगरसेवक वीर बापू जगताप, राजाभाऊ कदम, हडपसर विधानसभा उपाध्यक्ष संभाजी कामठे, युवा मोर्चा अध्यक्ष आयुष कामठे, सरचिटणीस कुंदन कामठे यांच्यासह महायुतीतील पक्षांचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
हडपसर विधानसभा उपाध्यक्ष प्रमोद टिळेकर यांच्याही निवासस्थानी आढळराव यांनी भेट दिली. यावेळी अनिल येवले, प्रभाग क्रमांक 41 चे अध्यक्ष बापू टिळेकर, हडपसर विधानसभा सरचिटणीस अनिल मेमाणे आदी उपस्थित होते. भाजप सरचिटणीस उद्धव कामठे यांचे निवासस्थानी त्यांच्यासह संघटक हर्ष टिळेकर, भाजपचे गोकुळ बरकटे, अमीन कामठे आदी उपस्थित होते.
फॉर्च्यून परफेक्ट सोसायटी येथेही आढळराव यांनी भेट दिली. यावेळी सोसायटीच्या पदाधिकार्यांकडून त्यांचे स्वागत करण्यात आले. अध्यक्षा शारदा गायकवाड, गौरव गायकवाड, अमोल क्षीरसागर, तानाजी गायकवाड, मंगेश महाडिक, किशोर जगताप, मयूर तडका, राहुल खंडागळे, अमोल गायकवाड, राहुल मस्के, मिरज गजरे आदी उपस्थित होते.
भाजपचे संघटक पांडुरंग हगवणे यांच्या निवासस्थानी त्यांच्यासह माजी नगरसेवक सुनील कामठे, संदीप बधे, श्रीकांत कामठे, अमर तुपे, शंतनू जगदाळे, मोनिका काळे, पुणे शहर जैन समाज अध्यक्ष जया बोरा, सुवर्णा गोरे आदि उपस्थित होत्या.
भगवान बुद्धांनाही अभिवादन
कपिल वास्तु बुद्ध विहार येथे भेट देऊन भगवान गौतम बुद्धांच्या पुतळ्याला देखील आढळऱाव यांनी अभिवादन केले. यावेळी मनसे शाखाध्यक्ष अमित जगताप, माजी अध्यक्ष शरद जगताप, अध्यक्ष अनिकेत जगताप, सदस्य भीमराव जगताप, अविनाश जगताप, चिंतामण जगताप, मंदा जगताप आदि उपस्थित होत्या.
महायुतीचे तीनही उमेदवार एकत्र
पुणे येथील छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड येथे शिवाजीराव आढळराव यांनी भेट दिली. त्यावेळी महायुतीच्या बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार, पुण्याचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हे देखील उपस्थित होते. नागरिकांसह, शेतकरी, अडते, हमाल, कामगार, तोलणार, व्यापारी, कष्टकर्यांचा यावेळी मोठा प्रतिसाद होता.