प्रत्यक्ष कर संकलनात दुप्पट वाढ

नवी दिल्ली – चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत प्रत्यक्ष कर संकलनात दुप्पट वाढ झाली आहे. आतापर्यंत 1.85 लाख कोटी रुपयाचे प्रत्यक्ष कर संकलन झाले आहे.

यामध्ये प्राप्तिकर आणि आगाऊ कर भरण्याचा समावेश असतो. त्याचबरोबर कंपनी कर, रोखे व्यवहार कराचा या करात समावेश असतो. गेल्या वर्षी 1 एप्रिल ते 15 जून या काळामध्ये केवळ 92 हजार 762 कोटी रुपयाचे प्रत्यक्ष कर संकलन झाले होते.

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने दिलेल्या माहितीत म्हटले आहे की आतापर्यंत या वर्षात 30 हजार 731 कोटी रुपयाचे कर परतावे देण्यात आले. या काळामध्ये निर्बंधाचा बराच परिणाम झाला असूनही कर संकलन वाढले आहे. त्यामुळे आगामी वर्षांमध्येही अपेक्षेइतके कर संकलन होण्याबाबत प्रत्यक्ष कर मंडळ आशावादी आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.