अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअरची घसरण

नवी दिल्ली – अदानी समूहातील परकीय गुंतवणूकदारांची तीन खाती गोठवली असल्याच्या वृत्तामुळे सोमवारी या समूहातील कंपन्यांच्या शेअरचे भाव कोसळले होते. ही खाती गोठवली नसल्याचे स्पष्टीकरण कंपनीने केल्यानंतर काल काही कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली होती. मात्र बुधवारी पुन्हा या समूहातील कंपन्यांचे शेअर पिछाडीवर होते.

या समूहातील अदानी पोर्ट व पेशल इकॉनॉमिक झोन कंपनीचा शेअर 7.17 टक्‍क्‍यांनी तर अदानी एंटरप्राइजेसचा शेअर 5.77 टक्‍क्‍यांनी घसरला.

अदानी ट्रान्समिशनचा शेअर पाच टक्‍क्‍यांनी, अदानी टोटल गॅस कंपनीचा शेअर पाच टक्‍क्‍यांनी, अदानी पॉवर कंपनीचा शेअर पाच टक्‍क्‍यांनी तर अदानी ग्रीन एनर्जीचा शेअर तीन टक्‍क्‍यांनी घसरला.

चुकीच्या वृत्तामुळे या समुहाच्या कंपन्यांच्या मुल्यांकानावर परिणाम झाला. त्याचबरोबर किरकोळ गुंतवणूकदारांचे नुकसान झाले असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.