आजचे भविष्य (गुरूवार, १७ जून २०२१)

मेष : व्यवसायात महत्वाच्या कामांना प्राधान्य व कामाचा झपाटा उत्तम राहील.

वृषभ : तुमच्या प्रयत्नांना अचूक अंदाजाची जोड लाभेल. नोकरीत मनाप्रमाणे काम करण्याचे समाधान मिळेल.

मिथुन : आवडत्या छंदात वेळ मजेत घालवता येईल. नवीन हितसंबंध जोडले जातील. सुखद प्रसंग साजरे होतील.

कर्क : तुमच्या कामाचे कौतुक होईल. मनोकामना पूर्ण होईल. महिलांना स्वास्थ्य लाभेल. खरेदीचे मनसुबे ठरतील.

सिंह : कामाचे वेळी काम करुन इतर वेळी जीवनाचा पूरेपूर आस्वाद घेण्याकडे कल राहील.

कन्या : व्यवसायात धोरणात्मक निर्णय घ्याल. नेहमीपेक्षा काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न राहील.

तूळ : पैशाची स्थिती समाधानकारक राहील. नोकरीत अत्यावश्‍यक कामांना प्राधान्य द्याल.

वृश्‍चिक : कामे सोयीस्करपणे लांबणीवर टाकाल. बोलल्याने गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या.

धनु : विचारापेक्षा कृतीवर भर दया. कुटुंब समवेत प्रवासाचे बेत सफल होतील. कामात महिला पुढाकार घेतील.

मकर : तुमच्या कामातील गुणांची कदर सर्वजण करतील. महिलांना मनाप्रमाणे वागण्याची मुभा मिळेल.

कुंभ : बराच काळ रेंगाळलेली कामे तातडीने हाती घेवून संपवा. तुमची विनाकारण चिडचिड होईल.

मीन :
व्यवसायात जाहिरात व प्रसिद्धी माध्यमांचा वापर करुन उलाढाल वाढवण्याचा प्रयत्न राहील.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.