मुंबई – नोव्हेंबर 23 पर्यंत प्रत्यक्ष कर संकलन 6.92 लाख कोटी रुपये झाले आहे. गेल्या वर्षाच्या या कालावधीतील कर संकलनाच्या तुलनेत हे कर संकलन 68 टक्क्यांनी जास्त आहे.
अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी संसदेत ही माहिती दिली.
अप्रत्यक्ष कर संकलनातही वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. अप्रत्यक्ष करांमध्ये जीएसटीचा समावेश आहे. गेल्या पूर्ण वर्षांमध्ये जीएसटी मधून 11.36 लाख कोटी रुपये जमा झाले होत. ऑक्टोबर महिन्यापर्यंत 8.10 लाख कोटीचे जीएसटी संकलन झाले आहे. करचुकवेगिरीचे प्रमाण वाढले आहे का असे विचारले असता त्यांनी नाही असे उत्तर दिले