नवी दिल्ली – आर्थिक आघाडीवर एक नविन प्रश्न निर्माण झाला आहे. एकतर किरकोळ महागाई भडकली आहे तर दुसरीकडे औद्योगिक उत्पादक उसळले आहे. सांख्यिकी विभागाने जारी केलेल्या माहितीनुसार फेब्रुवारी महिन्यात औद्योगिक उत्पादन केवळ उणे 3.6 टक्के इतके भरले आहे. खान, मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राची उत्पादकता या महिन्यात कोसळली आहे. गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे फेब्रुवारी महिन्यात औद्योगिक उत्पादन 11.7 टक्क्यांनी कोसळले होते.
आज जाहीर झालेल्या महागाईविषयक आकडेवारीनुसार मार्च महिन्यांत किरकोळ किंमतीवर महागाईचा दर 5.52 टक्के इतका भरला आहे. इंधनाबरोबरच अन्नधान्यांच्या किंमती वाढू लागल्यामुळे किरकोळ महागाई वाढल्याचे दिसून येते.