आम्हाला कठोर व्हायला लावू नका; दिल्लीच्या ऑक्‍सिजन पुरवठ्याबाबत सुप्रीम कोर्टाची केंद्राला तंबी

नवी दिल्ली, दि. 7 – दिल्लीच्या ऑक्‍सिजन पुरवठ्याबाबत चालढकल करणाऱ्या केंद्र सरकारला आज सुप्रीम कोर्टाने निर्वाणीच्या भाषेत इशारा दिला आहे. आमचा पुढील आदेश येईपर्यंत दिल्लीला रोज 700 मेट्रिक टन ऑक्‍सिजन पुरवठा होत राहिलाच पाहिजे. यात कसूर करून आम्हाला कठोर व्हायला लावू नका, अशा शब्दांत आज सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला समज दिली आहे.

दिल्ली सरकारला रोज सातशे एमटी ऑक्‍सिजन पुरवठा करण्याचा आदेश दिल्ली हायकोर्टाने दिला होता व तो आदेश सुप्रीम कोर्टानेही दोनच दिवसांपूर्वी कायम केला होता. पण अजूनही केंद्र सरकारने दिल्लीला हा पुरवठा सुरळीत केलेला नाही. आज दिल्ली सरकारचे वकील राहुल मेहरा यांनी कोर्टाला सांगितले की, आज सकाळी 9 वाजेपर्यंत आम्हाला केवळ 86 एमटी ऑक्‍सिजन मिळाला असून अजून 16 एमटी ऑक्‍सिजन पोहोचवला जात आहे. आम्हाला रोज सातशे एमटी ऑक्‍सिजनची गरज आहे. त्या आधारावर सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला आज फटकारले. त्यांनी म्हटले आहे की, आम्हाला कामाशी मतलब आहे.

आमच्यावर कठोर होण्याचा प्रसंग आणू नका, संपूर्ण देशातच करोनाची मोठी लाट आली आहे हे जरी खरे असले तरी राजधानी दिल्लीला ऑक्‍सिजन पुरवठ्याबाबत काही तोडगा काढावाच लागेल. काल केंद्र सरकारने दिल्लीला 730 एमटी ऑक्‍सिजनचा पुरवठा केल्याची माहिती सादर केली होती. पण आज त्यात खंड पडल्याने हा विषय उपस्थित झाला होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.