लासुर्णे -बोरी (ता. इंदापूर) येथील 32 वर्षीय फळ विक्रेता युवकाला लागण झाली आहे. त्याच्या संपर्कात काटेवाडी (ता. बारामती) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरसह 6 कर्मचारी, इतर 10 जण आले आहेत.
हा विक्रेता पुणे, मुंबईला नियमित ये-जा करीत होता. तो आजारी असल्याने काटेवाडी आरोग्य केंद्र व बारामती खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेत होता. त्याने रूई येथील कोविड सेंटरमध्ये तपासणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.