आग्रा – अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंम्प हे सोमवारपासून दोन दिवसीय भारत दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यासाठी भारतीय आणि अमेरिकन सुरक्षा दलांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येत आहे. ट्रम्प भेट देत असलेल्या अहमदाबाद, आग्रा आणि दिल्ली या शहरांना जणू लक्षरी छावण्यांचं स्वरूप प्राप्त झाले आहे.
दरम्यान, आपल्या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी डोनाल्ड ट्रंम्प हे आग्र्यातील जगप्रसिद्ध वास्तू ताजमहालला भेट देणार असल्याने आग्र्यामध्ये सध्या कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ट्रंम्प यांच्या सुरक्षेसाठी निमलष्करी दलाच्या १० तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच सुरक्षा विभागातर्फे ट्रंम्प आग्रा भेटीसाठी आले असता त्यांच्यावर दूरवरून निशाणा साधता येईल अशा जागा (स्नायपर पॉईंट्स) शोधून काढण्यात आल्या असून अशा ठिकाणी देखील सुरक्षा रक्षक नेमण्यात आले आहेत.
याव्यतिरिक्त ट्रंम्प यांच्या आग्रा भेटीच्या मार्गावर ४ ते ५ हजार सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले असून संपूर्ण मार्गावर सीसीटीव्हीद्वारे देखरेख ठेवण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त ट्रंम्प यांच्या भोवती त्यांच्या वयक्तिक सुरक्षा रक्षकांचे देखील कवच असेल.
असा असेल ट्रंम्प यांचा भारत दौरा
ट्रम्प यांच्या भारत भेटीच्या पहिल्या दिवशी साबरमती आश्रमास भेट देतील. तेथे हे दोन नेते सुमारे 15 मिनिटे असतील. तेथे ट्रम्प यांना चरखा भेट देण्यात येईल. त्याचबरोबर महात्माजींचा काळ आणि जीवनपट ऊलगडणारी दोन पुस्तके भेट देण्यात येतील. बापूजी आणि कस्तूरबांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या हृदयकुंज कुटीत राष्ट्राध्यक्ष सपत्नीक काही काळ चरख्यावर सुतकताई करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या हाऊडी मोदी या कार्यक्रमाप्रमाणे आयोजित नमस्ते ट्रम्प या मोटेरा स्टेडियमवरील कार्यक्रमास सुमारे सव्वा लाख लोक उपस्थित राहतील, अशी अपेक्षा आहे. या कार्यक्रमात काही सांस्कृतिक कार्यक्रम आणि बॉलिवूड कलाकारांच्या अदाकारी अपेक्षित आहेत.
या कार्यक्रमानंतर मोदी आणि मान्यवरांसोबत राष्ट्राध्यक्ष भोजन घेतील. तेथून ते विमानाने ताजमहाल पाहण्यासाठी रवाना होतील. ताजमहालच्या परिसरात ते दुपारी पाच वाजण्याच्या सुमारास अपेक्षित असून तेथे सुमारे 30 ते 45 मिनिटे असतील.
सोमवारी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि मेलानिया ट्रम्प राष्ट्रपतीभवनात एका पत्रकार परिषदेला संबोधित करतील. तेथून राजघाटावर जाऊन महात्मा गांधी यांच्या समाधीसमोर नतमस्तक होतील. त्यानंतर हैदराबाद हाऊस येथे द्वीपक्षीय चर्चेत ते सहभागी होतील. त्यानंतर ते भोजन घेतील. या बैठकीनंतर पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प संयुक्त पत्रकार परिषद घेतील. पत्रकार परिषद झाल्यावर अमेरिकन दुतावासाला भेट देऊन तेथे देशातील नामवंत उद्योगपतींची भेट घेतील. त्यात दोन्ही देशातील आर्थिक सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा होईल.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिलेल्या मेजवानीला उपस्थित राहून ट्रम्प रात्री दहाच्या सुमारास अमेरिककडे प्रयाण करतील.
SP City, Agra on security arrangements ahead of US President’s visit on 24 Feb: 10 Paramilitary companies have been deployed. Sniper points identified. Total 4000-5000 security personnel deployed at several points throughout the designated route. CCTV cameras placed across city. pic.twitter.com/XmRZnF8kTO
— ANI UP (@ANINewsUP) February 22, 2020
नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत की गुजरातचे?- राष्ट्रवादी काँग्रेस