नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत की गुजरातचे?- राष्ट्रवादी काँग्रेस

आतापर्यंत १५ देशांचे पंतप्रधान,राष्ट्राध्यक्षांचा अहमदाबाद दौरा

मुंबई: नरेंद्र मोदी नेमके देशाचे पंतप्रधान आहेत की गुजरातचे? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर उपस्थित केला आहे. आतापर्यंत तब्बल १५ देशांचे पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्षांनी अहमदाबाद आणि गुजरातचा दौरा केला असून यात चीन, जपान, फ्रान्स, कॅनडा अशा अनेक देशातील प्रमुखांचा समावेश आहे.

आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतात येत आहेत, त्यांनाही अहमदाबादला नेण्यात येणार आहे. या दौऱ्यासाठी अहमदाबाद येथे अवास्तव खर्च सुरू आहे, तिथली गरिबी झाकण्यासाठी भिंत बांधून रस्त्यातील झोपडपट्टी लपवण्याचीही तयारी झाली आहे. भारत म्हणजे फक्त गुजरात नाही, मग कोणत्याही परदेशी नेत्यांच्या दौऱ्यांमध्ये फक्त गुजरातची टिमकी का वाजवली जाते?, असा कणखर प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसने उपस्थित केला आहे.

डोनाल्ड ट्रम्प हे 24 आणि 25 फेब्रुवारी असे दोन दिवस भारत दौऱ्यावर येत आहेत. व्हाईटहाऊस मधून त्यांच्या निवडीची ही अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतरचा ट्रम्प यांचा हा पहिला भारत दौरा आहे. या दौऱ्यात त्यांच्या समवेत त्यांच्या पत्नी मेलॅनिया ट्रम्प याही भारत दौऱ्यावर येणार आहेत. भारत दौऱ्यात त्यांचा अहमदाबाद दौराही ठेवण्यात आला आहे.

…मग मशिदीसाठी ट्रस्ट का नाही – शरद पवार

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.