वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आज रात्री 9.30 वाजता राष्ट्राला संबोधित करणार आहेत. इराणबरोबर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचे भाषण महत्त्वाचे मानले जात आहे.
President @realDonaldTrump will deliver remarks at 11AM ET today.
— The White House 45 Archived (@WhiteHouse45) January 8, 2020
अमेरिकेच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख कासिम सुलेमानी यांचे निधन झाल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावामुळे युद्धाची भीती देखील व्यक्त केली जात आहे. डोनाल्ड ट्रम्प आज रात्री इराणबरोबर सुरू असलेल्या तणावाविषयी मोठी घोषणा करू शकतात. ट्रम्प यांच्या भाषणाविषयी व्हाईट हाऊसने माहिती दिली आहे.
इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट केले होते, “सर्व ठीक आहे.” इराणने इराकमधील अमेरिकेच्या दोन सैन्य तळांवर क्षेपणास्त्र हल्ला केला होता.