वृत्तसंस्था – डोमिनिकन गणराज्यमधून एक दुःखद घटना समोर आली आहे. येथील धावपट्टीवर एक खासगी विमान कोसळले आहे ज्यामध्ये नऊ जणांचा मृत्यू झाल्याची माहीती समोर आली आहे. अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
या गल्फस्ट्रीम विमानात सात प्रवासी आणि दोन क्रू मेंबर्स होते. जे बुधवारी सॅंटो डोमिंगोच्या लास अमेरिकास आंतरराष्ट्रीय विमानतळावर क्रॅश झाले. मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांपैकी सहा परदेशी नागरिक होते आणि एक डोमिनिकन नागरिक होता. मृत प्रवाशांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत. विमान कंपनी हेलिडोसा एव्हिएशन ग्रुपने या अपघाताला दुजोरा दिला आहे.