पुणे – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रणरागिनी म्हणून परिचीत असलेल्या मनसे पुणे शहर उपाध्यक्षा रुपाली पाटील-ठोंबरे यांनी पक्षात होत असलेल्या त्रासावर आपली भूमिका स्पष्ट केली.
आज शरद पवार साहेबांना आशीर्वाद देऊ शकतील असे ‛हात’ नाहीत व पवार साहेब झुकून नमस्कार करतील असे ‛पाय’ दिसत नाहीत ; हो म्हणूनच ठरलंय ! या वटवृक्षाच्या सावलीत महाविकास आघाडीत स्थिरावणार …@NCPspeaks @ShivSena@INCIndia
— Rupalipatilthombare (@Rupalispeak) December 16, 2021
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर रुपाली पाटील यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्यानं मनसेला हा मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, राजीनामा दिल्यानंतर रुपाली पाटील या आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
यातच आज अगदी कालपर्यंत कळतेय, समजतेय अशा चर्चांना पूर्णविराम देत त्यांनी स्वतःच एक सूचक ट्वीट करून ही माहिती दिली आहे.
त्यांनी ट्विट केले आहे की,’ आज शरद पवार साहेबांना आशीर्वाद देऊ शकतील असे ‛हात’ नाहीत व पवार साहेब झुकून नमस्कार करतील असे ‛पाय’ दिसत नाहीत ; हो म्हणूनच ठरलंय ! या वटवृक्षाच्या सावलीत महाविकास आघाडीत स्थिरावणार …त्यामुळे त्यांना आपला राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रवेश नक्की झाला आहे, हे अखेर जाहीर केले आहे.’
तत्पूर्वी,’राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्याशी त्यांची चर्चा झाली होती. जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार उद्या शुक्रवारी रुपाली पाटील या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे माध्यमांना सांगितले होते.