मोरादाबाद : उत्तर प्रदेशात करोनाबाधित डॉक्टरचा मृत्यू झाला, अशी माहिती मोरादाबादचे मुख्य वैद्यकीय अधिकारी एम. सी. गर्ग यांनी दिली.
करोनाची बाधा झालेल्या या डॉक्टरवर तीर्थंकर महावीर विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालयात काल रात्री उपचार सुरू होते. त्यांचे रविवारी रात्री निधन झाले, असे डॉ. गर्ग यांनी सांगितले. उत्तर प्रदेशात करोनाचे 1084 बाधित असून त्यातील 108 बरे झालेले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.