अशी करा आफ्टर डिलीव्हरी ड्रेसिंग

प्रत्येक स्त्रीला आपण सुंदर दिसावे असे वाटत असते त्यासाठी मेकअपपासून ते आऊटफिटपर्यंतच्या सर्वच गोष्टींकडे बारिक लक्ष त्यांनी ठेवलेले असते. त्यात जर एखादी स्त्री प्रेग्नंट असेल त्यावेळची ड्रेसिंग आणि आफ्टर डिलीव्हरी ड्रेसिंग यात खूप मोठा फरक होतो. त्यामुळे कोणते कपडे घालावेत आणि घालू नये यात स्त्रीया गोंधळून जातात. डिलीव्हरनंतर महिलांच्या शरिरयष्टीत मोठा बदल होतो. वजन वाढल्याने कपड्यांचा साइज एमपासून एल होतो. म्हणून स्त्रिया आपले बॉडी शेप बघून टेन्शनमध्ये येतात. अशा वेळी ड्रेसअप ते एक्‍सेसरीजकडे खास लक्ष ठेवायला पाहिजे. कुठल्या ही अशा आउटफिटमध्ये स्वत:ला फिट करण्याची कल्पना करू नये जे तुम्ही प्रेग्नेंसीच्या आधी घालत होता. साइजची काळजी न करता व्यवस्थित फिटिंगचे कपडे घालायला पाहिजे.

* टाइट फिट आणि बेल्ट असणारे ड्रेसेज टाळावे.

* फ्लॅट फुटवियर कधीपण आऊट ऑफ फॅशन झालेले नसतात म्हणून हिलचा वापर करणे टाळावे.

* तुम्ही थोडे मोठे व्ही नेकचे टॉप घालू शकता, जे पोटापासून ढिले व हिप्समध्ये थोडे टाइट असतील. लॅंगिंग्स एक चांगला ऑप्शन आहे.

* कपडे, ज्वेलरी, शूज ह्या सर्व वस्तू काही दिवसानंतर तुम्ही तुमच्या ओरिजनल शेपमध्ये आल्यावर वापर करू शकता, म्हणून त्यांना फेकायची घाई करू नका.

* जर तुम्ही एक वर्किंग वूमन असाल तर बिंदास ते घाला जे तुमच्या पर्सनालिटी आणि बॉडी शेपवर चांगले दिसेल.

* प्रॉपर डाइट आणि व्यायामाकडे आपले लक्ष्य केंद्रित करावे. जोपर्यंत बॉडी आपल्या आधीच्या शेपमध्ये येत नाही तो पर्यंत असे कपडे टाळावे ज्यात बॉडी शेप पूर्णपणे हायलाइट होत असेल. सद्याच्या काळात तुम्ही चांगले प्रिंटचे काही कपडे पसंत करू शकता.

Leave A Reply

Your email address will not be published.