मुंबई – शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठापूर्ण झालेल्या लढतीत रवींद्र जडेजा याने भारतास विजय मिळवून देण्यासाठी शर्थीची झुंज दिली. मात्र, त्याची ही झुंज संघास अंतिम फेरी गाठण्यासाठी अपुरीच पडली. आणि भारत विश्वचषकातून बाहेर पडला. अशातच भारतीय संघाचे पाठिराखे निराश असले तरी ट्विटरवरील खोचक टिकाना सडेतोड उत्तर देत आहे. यात अनेक क्रिकेटप्रेमी राजकीय नेते आणि बॉलिवूड कलाकारही टीम इंडियाचे समर्थन करून क्रिकेटप्रेम व्यक्त करत आहे. अशातच आपल्या बेताल आणि वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते विवेक ओबेरॉय यांनी पुन्हा एकदा मीम ट्विटरवर शेअर केला. त्यामुळे सर्व स्तरातून विवेकवर टीकेचा भडीमार होत आहे.
This is what happened to Indian fans in the #WC semi finals! #CWC19 #WorldCupSemiFinal #INDvsNZ #indiavsNewzealand pic.twitter.com/JuayObK02R
— Vivek Anand Oberoi (@vivekoberoi) July 12, 2019
विवेकनं त्याच्या ट्विटर अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यात एक माणूस हात पसरून समोरून येत असलेल्या एका महिलेला मीठी मारण्याचा प्रयत्न करतो. मात्र नंतर त्याला समजतं की ती महिला त्याच्या मागून येत असलेल्या एका माणसाला पाहून असं करत आहे. त्यानंतर तो माणूस पुढे निघून जातो. हा व्हिडिओ शेअर करताना विवेकनं त्याला, ‘वर्ल्डकप सेमी फायनलमध्ये भारतीय चाहत्यांसोबत काहीसं असंच झालं. #CWC19 #WorldCupSemiFinal #INDvsNZ #indiavsNewzealand’ असं कॅप्शन दिलं आहे. यापूर्वी ‘विवेक ओबेरॉय’ने सोशल मीडियावर एक वादग्रस्त ट्विट केलं होत. विवेकने ट्वीटमध्ये एका युझरचं मीम शेअर केले असून, या मीममध्ये विवेक स्वतः असून ऐश्वर्या राय, सलमान खान आणि अभिषेक बच्चनही दिसत आहेत. विवेकने हे मीम शेअर करत फक्त एक्झिट पोलचीच थट्टा उडवली नाही तर ऐश्वर्या रायचीही थट्टा उडवली होती. त्यामुळे सर्व स्तरातून विवेकवर टीकेचा भडीमार झाला होता.