लोणंद – पाडेगाव, ता. फलटण येथील विविध विकासकामांचे उद्घाटनप्रसंगी आयोजित बैठकीत आ. दीपक चव्हाण यांनी तालुका वाईट प्रवृत्तीच्या लोकांच्या हातात जाऊ देऊ नका असे सांगत तालुक्याच्या विकासासाठी आगामी काळात रामराजे गटाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले.
पाडेगाव येथील परहर खुर्द ते तरटीचा मळा रस्ता डांबरीकरण, गावठाण काळुबाई मंदिर सभामंडप, दलित वस्ती गटार, दलित वस्ती रस्ता डांबरीकरण, गावठाण पालखी मार्ग रस्ता, होडी वस्ती रस्ता डांबरीकरण, ताम्हणे वस्ती रस्ता खडीकरण, जिजामाता चौक, शिंदे वस्ती रस्ता, होडी वस्ती पाणीपुरवठा टाकी, अशा विविध विकासकामांची भूमिपूजन, उद्घाटने आमदारांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी पाडेगावच्या सरपंच स्मिताताई खरात, पंचायत समिती सदस्या रेखाताई खरात, मा. जि.प. सदस्य अशोकराव खरात, वसंतराव गायकवाड आदींनी आपली मनोगते व्यक्त केली.
या कार्यक्रमास सोसायटीचे चेअरमन शशिकांत खरात, प्रवीण ढावरे, सोमनाथ खरात, व्हाईस चेअरमन रामदास नेवसे, राजेश खरात, बापू ढावरे, दत्तात्रय खरात, राजेंद्र भुजबळ, आनंद ढावरे, दिलीप बागडे, प्रल्हाद गोरे, राहुल कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब खरात सर यांनी केले तर बिपीन मोहिते यांनी आभार मानले.