पिंपळे गुरव – दिपावली हा प्रकाशाचा उत्सव मानला जातो. ही बाब विचारात घेऊन नागरिकांनी घर व परिसर प्रकाशमय करावा. तसेच प्रयत्नांनी आयुष्य प्रकाशमय करावे, असे आवाहन भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी केले.
पिंपळे गुरव येथील देवकर पथ चौकातील देवकर परिवाराच्या वतीने वसुबारस हा दिवाळीतला पहिला दिवस साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात शंकर जगताप, माजी नगरसेवक अंबरनाथ कांबळे, बबन देवकर, विजया देवकर यांच्या हस्ते गाई आणि पाडसाचे पूजन करण्यात आले. यावेळी कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.
वसुबारसनिमित्त शहरात आणि उपनगरांमध्ये असलेल्या गोठ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. तर काही नागरिकांनी गाय आणि वासराची मूर्ती आणून प्रतिकात्मक पूजन केले. काही ठिकाणी नागरिकांनी गाय आणि वासरु आणून नागरिकांसाठी पूजनाची व्यवस्था केली होती.