देशभरात दिवाळीचा उत्साह….

राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा

नवी दिल्ली : आज दिवाळीचा सण देशभर आनंद आणि उत्साहाने साजरा केला जात आहे. पर्यावरणाची काळजी घेत ग्रीन दिवाळीही देशाच्या अनेक भागात साजरी केली जात आहे. प्रदूषण पातळी कमी करण्यासाठी प्रशासनही त्या त्या स्तरावर सज्ज झाले आहे. दरम्यान, या दिव्यांच्या सणाच्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवाळीच्या शुभेच्छा देऊन देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.

सकाळी दिवाळीच्या शुभेच्छा देताना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी असे लिहिले की दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर सर्व देशवासियांचे अभिनंदन. या दिवशी प्रेम, सहानुभूती आणि सुसंवाद यांचा दिवा लावून प्रत्येकाच्या, विशेषत: गरजूंच्या जीवनात आनंद मिळवण्याचा प्रयत्न करूया, अशा प्रकारच्या शुभेच्छा त्यांनी यावेळी दिल्या.

तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर देशवासियांना अनेक शुभेच्छा. हा दीपोत्सव आपल्या सर्वांच्या जीवनास नवीन प्रकाश देईल आणि आपला देश आनंदाने, समृद्धीने आणि सौभाग्याने सर्वकाळ प्रकाशात राहो. अशा शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.