सत्यमेव जयते 2 मध्ये जॉन अब्राहम आणि दिव्या खोसला कुमारच्या मुख्य भूमिका आहेत. लवकरच हा सिनेमा रिलीज होणार आहे. दिव्या आणि जॉन सध्या या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये खूप बिझी आहेत. यामध्ये दिव्या खोसला कुमार चक्क एका राजकारणी महिलेच्या रोलमध्ये दिसणार आहे. सशक्त आणि सक्षम महिलेची व्याख्या ती पडद्यावर सार्थ करून दाखवणार आहे.
ही राजकारणी महिला पडद्यावर साकारण्यासाठी दिव्याला खूप निरीक्षण आणि बदलही करावे लागले आहेत. ही महिला आजच्या काळातील असल्यामुळे तिच्यात खूप आधुनिक छटा असणार आहेत, हे दिग्दर्शकांनी समजावून सांगितल्याप्रमाणे दिव्याने स्वतःमध्ये बदल घडवून आणले आहेत. तिने महिला राजकारणी असलेल्या “आंधी’, “गुलाब गॅंग’ आणि “राजनीती’सारख्या सिनेमांचा अभ्यासही केला.
खूप टिपिकल व्हायला नको आणि प्रेक्षकांनी टाळायला नको, यादृष्टीने तिने ही राजकारणी महिला उभी केली आहे. यापूर्वी “मॅडम चीफ मिनिस्टर’मध्ये रिचा चढ्ढा, “थलायवी’मध्ये कंगना राणावत आणि “आंधी’मध्ये सुचित्रा सेन यांनी राजकारणी महिलांचे रोल केले आहेत. आता त्यांच्या पंक्तीत दिव्याही जाऊन बसली आहे.