मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा भलेही मोठ्या पडद्यापासून दूर असली, तरी ती सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असते. ती चाहत्यांसोबत सतत आपले डेली रुटीन फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.
अनुष्का शर्माने नुकतेच काही ग्लॅमरस फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये ती ग्रीन कलरच्या मोनोकिनीमध्ये समुद्रकिनारी पोज देताना दिसत आहे. या फोटोमध्ये अनुष्का पहिल्यासारखी स्लिम आणि फिट दिसत आहे.
View this post on Instagram
तिने मुलीला जन्म दिल्यानंतर अनुष्का प्रथमच जुन्या अंदाजात दिसून येत आहे. या फोटोंवर लाखो चाहते असंख्य लाइक्स आणि कमेंट करत आहेत. या फोटोंवर तिचा नवरा विराट कोहलीनेदेखील कमेंट केली आहे.
दरम्यान, अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली हे दाम्पत्य या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यात एका मुलीचे आई-वडील झाले आहेत. अनुष्का शर्मा सध्या आपल्या प्रोफेशनल लाइफपासून दूर असून, ती आपली मुलगी वामिकासोबत वेळ घालवित आहे.