गुरुवारी 11 मार्च रोजी महाशिवरात्री उत्सव आहे. यनिमित्ताने आम्ही तुम्हाला शिवकालीन एकमेव मंदिराबद्दल सांगत आहोत. महादेव अर्थात भगवान शंकर यांचे देशभरात अनेक मंदिरं आहेत. यापैकी काही मंदिरामध्ये आजही काही चमत्कार घडत असल्याचे समज आहेत. उदा. हिमाचल प्रदेशातील कांगडा येथील अर्धनारीश्वर मंदिरात महाशिवरात्रीला दोन भागामध्ये विभागलेले शिवलिंग एकत्र जुळते. हे विभाजित शिवलिंग एकत्र जुळणे म्हणजेच भगवान शंकर आणि माता पार्वती यांचे इथे मिलन होते, अशी मान्यता आहे.
वास्तविक हिमाचल प्रदेशात बरीच प्राचीन आणि महत्त्वाची धार्मिक स्थळे आहेत. त्यापैकी कांगडा जिल्ह्यात अतिशय वैशिष्ट्यपूर्ण शिवलिंग आहे. इंदोरा उपविभाग मुख्यालयापासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या शिवमंदिर काथगडचे विशेष महत्त्व आहे. देशभरातील भाविक महाशिवरात्रीला या मंदिरास भेट देतात. काठगड महादेव मंदिर ज्योतिष नियमांनुसार स्थापित केले गेले आहे.
शिव पुराणात सांगितलेल्या आख्यायिकानुसार ब्रम्हा आणि विष्णू यांच्यात मोठेपणावरून युद्ध झाले होते. भगवान शिव हे युद्ध पहात होते. दोघांचे युध्द शांत करण्यासाठी भगवान शिव महाग्नी स्तंभरूपात प्रकट झाले. तोच खांब काठगडमध्ये स्थित महादेवाचा शिवलिंग मानला जातो. याला अर्धनारीश्वर शिवलिंग म्हणूनही ओळखले जाते.
असे म्हटले जाते की ग्रह आणि नक्षत्रानुसार येथे दोन भागात विभागलेल्या शिवलिंगातील अंतर कमी-जास्त होत राहते आणि शिवलिंगाचे दोन्ही भाग शिवरात्रीला एक होतात.
इथले शिवलिंग गडद तपकिरी आहे. सात फूटांहून अधिक उंच, सहा फूट तीन इंच परिघात स्वयंभू प्रकट झालेले हे शिवलिंग दोन भागात विभागलेले आहे. लहान भागाला माता पार्वती आणि मोठ्या भागाला भगवान शिव मानले जाते.
येथे दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त तीन दिवसांची यात्रा भरते. शिव आणि शक्ती अर्ध-नारीश्वर स्वरूपाचा संगम पाहण्यासाठी असंख्य भाविक येथे येतात. याशिवाय श्रावण महिन्यात भाविकांची गर्दी दिसून येते.
ऐतिहासिक समजुतीनुसार काठगड महादेव मंदिराचे बांधकाम सिकंदरने बांधले होते. या शिवलिंगामुळे प्रभावित होऊन सिकंदरने टेकडीवर मंदिर बांधण्यासाठी येथील जमीन सपाटीकरण करुन मंदिर बांधले.