दक्षता आयोगाकडे भ्रष्टाचाराच्या 27 हजार 590 तक्रारी

नवी दिल्ली – सन 2020 या वर्षात केंद्रीय दक्षता आयोगाकडे केंद्र सरकारी कार्यालयांमधील भ्रष्टाचाराच्या एकूण 27 हजार 590 तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत अशी माहिती सरकारतर्फे आज संसदेत देण्यात आली. चालू वर्षातील पहिल्या दोन महिन्यात एकूण 5922 तक्रारी दाखल झाल्या आहेत.

गेल्या वर्षी ज्या 27 हजार 590 तक्रारी दाखल झाल्या आहेत, त्यातील 15004 प्रकरणे पुढील कारवाईसाठी मुख्य दक्षता अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आली आहेत. 140 प्रकरणे अधिक चौकशीसाठी सादर करण्यात आली असून यातील काही प्रकरणे सीबीआयकडे तपासासाठी देण्यात आली आहेत. कार्मिक विभागाचे राज्यमंत्री जितेंद्र प्रसाद यांनी लोकसभेत प्रश्‍नोत्तराच्या तासांत ही माहिती दिली. केंद्रीय दक्षता आयोग हा प्रामुख्याने केंद्र सरकारी कार्यालये आणि सार्वनिक क्षेत्रातील कंपन्या, बॅंका यांच्यातील भ्रष्टाचारांच्या प्रकरणांची चौकशी करण्याचे काम करतो.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.