वडापुरी -महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारतर्फे ब्रेक द चेन मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत दि.22 एप्रिलच्या रात्री 8 वाजल्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
पुणे-सोलापूर जिल्ह्याची सीमेवर इंदापूर तालुक्यातील हिंगणगाव येथे पुणे-सोलापूर महामार्गावरून अत्यावश्यक सेवा वगळता खासगी वाहतूक बंद करण्यात येत आहे. तसेच रस्त्यावरती धावणाऱ्या गाड्यांची तपासणी करून अत्यावश्यक व्यतिरिक्त इतर वाहनांवर कारवाई केली जात आहे.
अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर जिल्ह्यात किंवा जिल्हांतर्गत प्रवास करता येणार नाही.आज पासून 1 मे सकाळी 7 वाजेपर्यंत राज्यभरात जिल्हाबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे.