पेठ : कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी पेठ (ता.आंबेगाव) येथील नागरिकांना घरोघर प्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले. पेठ येथे आर्सेनिक अल्बम या गोळ्यांचे मोफत वाटप माजी उपसरपंच संतोष बबन धुमाळ यांच्या वतीने सर्व नागरिकांना करण्यात आले आहे. पेठ गावात 6 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून माजी उपसरपंच यांनी मोफत आर्सेनिक अल्बम ३० कोरोनाप्रतिबंधक होमिओपॅथी गोळ्यांचे वाटप मोफत केले.
कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात थैमान घातले असून रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले असून करोना व्हायरसचा सामना करण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती चांगली असणे आवश्यक आहे. लोकांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तसेच त्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी माजी उप सरपंच संतोष बबन धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पेठ गावातील सर्व कुटुंबांना या गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात येत आहे.
यावेळी उपसरपंच अनिल सणस, अशोक राक्षे, बाळासाहेब रागमहाले,निलेश क्षिरसागर, दिपाली पातकर,तलाठी हेमंत भागवत,संदिप तोत्रे, ग्रामसेवक चौगुले ,सलीम तांबोळी,शाहरूख पटेल यांनी वाड्यावस्त्यावर जाऊन जनजागृती करून गोळ्यांचे वाटप केले.