जुन्नर, (वार्ताहर) – महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ महाराष्ट्र शासनाच्या वतीने बांधकाम कामगारांना संसार उपयोगी साहित्याचे वाटप जुन्नरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात करण्यात आले. यावेळी जुन्नर परिसरातील 500 बांधकाम कामगारांना या साहित्य संचाचे वाटप करण्यात आले. या योजनेअंतर्गत आतापर्यंत सुमारे 1200 बांधकाम कामगारांना या साहित्याचे वाटप करण्यात आलेले आहे.
आमदार अतुल बेनके यांच्या माध्यमातून जुन्नरमध्ये शासनाचा हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस जुन्नर शहर अध्यक्ष धनराज खोत, बाजीराव ढोले, मोहित ढमाले, बाळासाहेब सदाकाळ, सचिन गिरी, दर्शन खोत, सामाजिक कार्यकर्त्या रिना खरात आदींसह बांधकाम कामगार उपस्थित होते.
या आधी बांधकाम कामगारांना शासनाकडून मिळणारे हे संसार उपयोगी साहित्य आणण्याकरिता पुण्याला जावे लागत होते. धनराज खोत यांनी याबाबत पुढाकार घेऊन हे साहित्य जुन्नर मध्येच या बांधकाम कामगारांना उपलब्ध करून दिल्याने उपस्थित कामगारांनी त्यांचे आभार मानले.