बेल्हे (वार्ताहर) – जुन्नर तालुक्यातील बोरी येथील कुकडी नदी घाट तसेच नारायणगाव व जुन्नर येथे निरंकारी स्वयंसेवकांनी स्वच्छता केली. अमृत परियोजने अंतर्गत पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी, मुळा, मुठा, भीमा, भामा, घोडनदी, पवना, वेळू, कुकडी, मीना, कर्हा, आनंदी अशा सर्व नद्यांवरील विविध घाट तसेच शहरातील विविध तलाव अशा 43 ठिकाणी एकाच वेळी विशाल स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
ज्यामध्ये ओंकारेश्वर नदी घाट, कात्रज तलाव, आळंदी-देहू येथील इंद्रायणी नदी घाट, मोरया गोसावी येथील पवनानदी घाट, झुलेलाल घाट, खडकवासला धरण परिसर, नाझरे धरण, पाषाण तलाव इत्यादी ठिकाणे प्रमुख आहेत. त्यामध्ये स्थानिक निरंकारी सेवादल तसेच ठिकठिकाणचे प्रशासकीय कर्मचारी 8 हजारांपेक्षा अधिक संख्येने सहभागी झाले होते.