चिंबळी-“करोनो व्हायरस’चा प्रसार रोखण्यासाठी कुरूळी येथील सामाजिक कार्यकर्ते व युवा उद्योजक तानाजी जैद व नाना जैद यांनी घरोघरी जाऊन मास्कचे वाटप केले. करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
मात्र नागरिकांनी घाबरून न जाता योग्य खबरदारी घ्याववी, असे आवाहन आणि जनजागृती प्रत्येक जबाबदार नागरिकांकडून करण्यात येत आहे. भयभीत होऊ नका, जागरूक रहा, सोशल मीडियावर पसणाऱ्या “फेक’ मेसेजकडे दुर्लक्ष करा, असे मेसेज पुढे फॉडवर्ड करू न असे आवाहन सरकार ,पोलीस, स्थानिक प्रशासन, माध्यमांद्वारे करण्यात येत आहे.