पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त वाघोलीत रुग्णांना फळ वाटप

वाघोली (प्रतिनिधी) :  वाघोली तालुका हवेली येथे भारताचे सर्वात यशस्वी पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त व पंडित स्व. दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त सेवा समर्थन सप्ताह कार्यक्रम निमित्ताने भारतीय जनता पार्टी वाघोली शहर व हवेली तालुका युवा मोर्चाच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र वाघोली  येथे रुग्णांना फळवाटप करण्यात आले.

यावेळी भाजप पुणे जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब सातव पाटील, हवेली तालुका अध्यक्ष संदीप भोंडवे, वैद्यकीय अधिकारी डॉ.नरसिंह लोखंडे, आरोग्य सहायक रंगनाथ वराडे,वाघोली शहर अध्यक्ष केतन जाधव ,युवा मोर्चा अध्यक्ष अनिल सातव पाटील, भाजप वाघोली सरचिटणीस विद्याताई पाटील, नरेंद्र पाटील, सूर्यकांत जाधव ,निलेश जाधव,जावेद शेख, सचिन पवार, व पदाधिकारी उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.