वाघोली (प्रतिनिधी) : वाघोलीचा महापालिकेत समावेश झाल्यानंतर वाघोली येथील कार्यालयात जन्म मृत्यू नोंदणी करणाऱ्या अधिकाऱ्याची नियुक्ती झाली नसल्याने व अंत्यविधी करण्यापूर्वी मयत प्रमाणपत्र मिळत नसल्याने वाघोलीतील नागरिकांची हेळसांड होत असल्याचे दैनिक प्रभात मध्ये प्रसिद्ध झाले होते.
याबाबत शिवसैनिक सागर गोरे यांनी मृत व्यक्तीचे मयत प्रमाणपत्र मिळण्यास नागरिकांना उशीर झाला तर वाघोली महापालिका कार्यालयाच्या परिसरात अंत्यविधी करण्यात येईल असा इशारा यांनी दिला होता.
याबाबत पुणे महानगरपालिकेच्या नगर रोड क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त सुहास जगताप यांनी याठिकाणी मृत्यूचे पास देण्याबाबत तुषार वाघमारे या कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून दिनांक 22 सप्टेंबर पासून या कर्मचाऱ्या मार्फत कामकाज करण्यात येणार आहे.
याबाबत पुणे महानगरपालिकेकडे सागर गोरे यांनी निवेदन दिले होते.
वाघोली चा पुणे महानगर पालिकेत समावेश झाल्यानंतर जन्म-मृत्यूची नोंद तथा मृत्यूच्या पासाबाबत नागरिकांची हेळसांड होत होती याबाबत शिवसैनिक सागर गोरे यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर मृत्यूचे पास देण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या वतीने तातडीने कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे आता नागरिकांची हेळसांड व हेलपाटे वाचणार आहेत.