भवानीनगर – सणसर (ता. इंदापूर) येथील पार्थबाबा निंबाळकर मित्रमंडळ परिवाराच्या वतीने सर्व मुस्लीम बांधवांना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते रमजान ईदनिमित्त शुभेच्छा देऊन सर्व फळांचे तयार केलेले किट वाटप करण्यात आले.
यावेळी करोनाच्या पार्श्वभूमीवर नियम व अटी पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पार्थबाबा मित्र मंडळ परिवाराच्यावतीने दरवर्षी सणसर येथील सर्व तरुण एकत्र मिळून मुस्लीम बांधवांना रमजान सणानिमित्त शुभेच्छा देऊन इफ्तार पार्टीचे आयोजन करत असतात; परंतु यावर्षी करोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी प्राथमिक स्वरुपात दोन, तीन जणांना कीट देण्यात आले.
उर्वरित सर्व मुस्लीम बांधवांच्या घरी जाऊन या किटचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास पार्थ निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, बाळासाहेब पाटील, डॉ. दीपक निंबाळकर, हेमंत निंबाळकर, विक्रम निंबाळकर, विनोद सपकळ, शब्बीर काझी उपस्थित होते.