चिंबळी – खेड तालुक्यातील पिंपळगाव-रेटवडी मतदार संघातील जिल्हा परिषद सदस्या तसेच खेड तालुक्याचे कार्यसम्राट आमदार दिलीप आण्णा मोहिते पाटील यांचे खंदे समर्थक निर्मला पानसरे यांची पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
जि. प. परिषदेचे माजी सदस्य शांताराम सोनवणे व कैलास लिंभोरे, माजी सभापती विलास कातोरे व खेड तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्व आजी-माजी पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.