संशोधकांचा दावा
ह्युस्टन : करोना विषाणूबाबत संशोधन करणाऱ्या संशोधकांच्या अभ्यासानुसार या विषाणूचा प्रसार लक्षणे दिसण्यापूर्वीच झालेला असतो. या विषाणूचा प्रादुर्भाव होण्याचा कालावधी एक आठवड्यापेक्षाही कमी असतो. ज्या व्यक्तींना संसर्ग झालेला आहे, मात्र त्याची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत अशाच व्यक्तींकडून 10 टक्के रुग्णांमध्ये याचा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे.
दुसऱ्यास व्यक्तीस संसर्ग होणे आणि संक्रमित दुसऱ्या व्यक्तीमध्ये लक्षणे दिसण्यासाठी लागणारा वेळ मोजून करोना विषाणूचा संक्रमणाच्या कालावधीबाबतचे संशोधन “जर्नल इमर्जिंग इन्फेक्टीव्ह डिसिसीज’ने प्रकाशित केलेले आहे. ऑस्टिन येथील टेक्सास विद्यापीठातील संशोधकांच्या मते, चीनमधील करोना विषाणूसाठीचा संक्रमण कालावधी सरासरी चार दिवस होता. या साथीच्या रोगाचा वेग प्रत्येक प्रकरणात किती लोक संक्रमित होतात आणि संसर्ग पसरण्यास किती वेळ लागतो या दोन गोष्टींवर अवलंबून असतो. असे ते म्हणाले.
करोना विषाणूच्या बाबतीत संसर्गाचा प्रसार होण्यास फार कमी वेळ लागत असल्याने त्यावर नियंत्रण मिळवणे अवघड बनले आहे. इबोलाच्या बाबत हा कालावधी काही आठवड्यांचा होता. इन्फ्लुएन्झापेक्षा हा कालावधी अधिक असल्याने त्यावर नियंत्रण मिळवणे सोपे होते, असे यूटी ऑस्टिनमधील अभ्यास-लेखक लॉरेन अँसेल मेयर्स म्हणाले.
करोना विषाणू फ्लूसारख्या पसरू शकतो. शास्त्रज्ञांनी चीनमधील 93 शहरांमधील 450 पेक्षा जास्त संसर्गांच्या प्रकरणाच्या रिपोर्टची तपासणी केली. लक्षण नसलेल्या लोकांकडूनच विषाणूचा संसर्ग झाल्याचे त्यात निष्पन्न झाले. याला “प्री-सिम्प्टोमॅटिक ट्रान्समिशन’ म्हणून ओळखले जाते.
ज्यांना विषाणूचा संसर्ग झाला आहे परंतु अद्याप ते आजारी पडलेले नाहीत अशा व्यक्तींकडूनच संसर्गाचा फैलाव झाला आहे. मात्र या संसर्गाच्या कालावधीबाबत संशोधकांमध्ये मतभेद आहेत. मात्र नव्या संशोधनामुळे सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्यांना रोगाला अटकाव करणे सोपे जाऊ शकेल.