औंध – ग्रामीण रुग्णालय औंध कोविड सेंटर मध्ये ऑक्सीजन पुरवठा लाईन मध्ये अचानक बिघाड झाल्याने औंध कोविड सेंटर मधील रुग्न ऑक्सिजन पुरवठा सुविधेसाठी वडूज व मायणी येथे हलविण्यात आले
अधिक माहिती अशी औंध कोविड सेंटर मध्ये मंगळवारी रात्री 9 च्या सुमारास अचानक ऑक्सिजन पुरवठा लाईन मध्ये बिघाड झाल्याने कोविड सेंटर मध्ये अचानक तणावाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी रुग्णालयातील नर्स व इतर स्टाफ यांच्या सतर्कतेमुळे वेळीच ऑक्सिजन पुरवठालाईन मधील बिघाड निदर्शनात आलात्यामुळे मोठा अनर्थ टळला यावेळी डॉक्टर्स नर्स व इतर स्टाफ यांनी रिष्ठ अधिकार्यांना माहिती देऊन तात्काळरुग्णांसाठी ऑक्सिजन बेडच्या सुविधा
उपलब्धतेबाबत माहिती घेऊन वडूज येथील साळुंखे डॉक्टर यांच्याकडे आठ रुग्ण तर ग्रामीण रुग्णालय वडूज येथे दोन रुग्ण व मायणी मेडिकल कॉलेज येथे पाच रुग्ण ॲम्बुलन्स च्या साह्याने त्वरित सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले.
यावेळी रुग्णांवरती व्यवस्थित उपचार सुरू करण्यात आले आसल्याबाबतची माहिती खटाव तहसीलदार किरण जमदाडे यांनी रुग्णांच्या नातेवाइकांना दिली तर ऑक्सीजन लाईन मध्ये झालेला बिघाड प्रशासनाकडून रात्रीतच सुरळीत करण्यात येणार असल्याचेही त्यांच्याकडून सांगण्यात आले यावेळी डॉक्टर शेख मा सभापती संदीप मांडवेउपस्थित होते.