लोणी धामणी- आंबेगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातही नागरिकांमध्ये कोरोना विषाणू संदर्भात जनजागृती होत असून, प्रशासन देखील आवश्यक वैद्यकीय सोयी-सुविधा पुरविण्याचा आटोकोट प्रयत्न करीत आहेत. त्याचबरोबर विविध पक्षांचे पदाधिकारी, स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन, आरोग्य विभाग व विविध सेवाभावी संघटनांमार्फत ग्रामस्थांना करोना विषाणूमूळे होणाऱ्या प्रादुर्भावासंदर्भात जनजागृती करण्यात येत आहे.
लोणी (ता. आंबेगाव) येथील मूळ रहिवाशी व सध्या नवी मुंबई येथे कार्यरत असणारे घनसोली तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष राजू थोरात यांनी स्वखर्चाने लोणी गावठान, वाड्या-वस्त्यांवर जाऊन घरोघरी फवारणी करून परिसर निर्जंतुक केला.
याबरोबरच सध्याच्या बंद काळात घराबाहेर पडू नये, आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा, तसेच पुणे मुंबई आणि इतर प्रदेशातून येणाऱ्या नागरिकांची माहिती स्थानिक प्रशासनला द्यावी, असे आवाहन राजू थोरात यांनी केले आहे. यावेळी माजी चेअरमन सतीश थोरात उपस्थित होते.