मुंबई – शिवसेनेचे खासदार तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव डॉ. श्रीकांत शिंदे दिल्लीला रवाना झाले आहेत. शिंदे यांच्या या अचूक टायमिंगवरून राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. एकीकडे जाहिरातीवरून राज्यातील राजकारण तापलेले असताना दुसरीकडे शिंदे यांच्या या दिल्लीवारीमुळे मोठ्या घडामोडीची शक्यता वर्तविली जात आहे.
दरम्यान, भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनीही या जाहिरातबाजीवरून शिंदेसेनेवर टिका केली आहे. ते म्हणाले, एखाद्या सर्व्हेच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पसंती दर्शवली असले तर आम्हाला आनंदच आहे. ते आमच्या युतीचे मुख्यमंत्री आहेत. जाहिरात करण्यात देण्यातही आमची अडचण नाही.
मात्र, यामध्ये शिंदे यांना जास्त पसंती दाखवली आहे आणि देवेंद्र फडणवीसांना कमी दाखवण्याची गरज नव्हती. त्यात जर शिंदे यांच्या संदर्भातील आकडेवारी दिली असती तर बरे झाले असते. अशी जाहिरात देणे युतीसाठी योग्य नाही. युतीचे वातावरण कलुषित करण्याचा हा प्रयत्न आहे.