Lok Sabha Election 2024 – Mahayuti Seat Allocation ।राज्यात सत्ताधारी महायुतीच्या जागा वाटपावरून सध्या ओढाताण होताना दिसून येतीय. सत्तेत असणारे शिंदे गट आणि अजित पवार गट काही जागांवर असून बसल्याचा सध्या चर्चा सुरु आहे. त्यातच दोन्ही पक्षांना सन्मानजनक जागा देण्यात येणार असल्याचे भाजपकडून सांगण्यात येतंय. त्यामुळं आता महायुतीच्या जागव वाटपाचा तिढा सुटला असल्याची शक्यता वर्तवण्यात येतीय.
या बैठकीत महायुतीच्या फॉर्म्यूल्यावर चर्चा होणार आहे. यात महायुतीच्या घटकपक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अमित शाह यांच्याशी बैठक होईल. या बैठकीत महायुतीतील जागावाटपावर चर्चा केली करून जागावाटपावर शिक्कामोर्तब केले जाण्याची शक्यता आहे.
जागावाटपाच्या संदर्भातील चर्चेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे महायुतीतील जागावाटपावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस सध्या दिल्लीत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज रात्री दिल्लीला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. लोकसभेच्या जागांच्या अनुषंगाने आज अंतिम चर्चा पार पडणार असल्याची माहिती आहे. दिल्लीतील आजच्या बैठकीनंतर महायुतीचे उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या बैठकीत चार ते सहा जागा राष्ट्रवादी काँग्रेसला 12 ते 15 जागा शिवसेना एकनाथ शिंदेंना जर महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुती सहभागी झाली तर त्यांना एक जागा उर्वरित 28 ते 32 जागांवर भारतीय जनता पक्ष स्वतःचे उमेदवार उतरवणार या फॉर्मुल्यावर निर्णय झाल्याची माहिती मिळते