Lok Sabha Election Narendra Modi VS Ajay Rai | लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने काल शनिवारी चौथी यादी जाहीर केली. या यादीत एकुण 46 उमेदवारांची नावे असून यात महाराष्ट्रातील चार उमेदवारांचा देखील समावेश आहे. याशिवाय या यादीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात काँग्रेस कोण लढणार? त्या उमेदवाराचे नाव देखील जाहीर करण्यात आले आहे.
काँग्रेसने अजय राय यांना वाराणसीतून उमेदवारी दिली आहे. गेल्या दोन लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसने अजय राय यांना पीएम मोदींविरोधात उभे केले होते, मात्र दोन्ही निवडणुकांमध्ये त्यांचा दारुण पराभव झाला होता. यातच त्यांना तिसऱ्यांदा संधी देण्यात आली आहे.
कोण आहे अजय राय?
काँग्रेस नेते अजय राय यांचा जन्म 7 ऑक्टोबर 1969 रोजी वाराणसी येथे झाला. अजय राय यांनी आपल्या करिअरची सुरुवात भाजपची विद्यार्थी संघटना ABVP मधून केली होती. 1996 मध्ये त्यांनी भाजपच्या तिकिटावर कोलासला मतदारसंघातून पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांनी सीपीआयचे आमदार उदल यांचा 484 मतांच्या थोड्या फरकाने पराभव केला. यानंतर त्यांनी 2002 आणि 2007 च्या लोकसभा निवडणुकीत बहुजन समाज पक्षाच्या (BSP) अवधेश सिंह यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता.
2009 मध्ये भाजप सोडला
अजय राय यांनी 2009 मध्ये भाजप सोडला. पक्षाने त्यांना वाराणसीतून लोकसभा निवडणुकीचे तिकीट दिले नसल्याने त्यांनी भाजपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. यानंतर ते सपामध्ये रुजू झाले. सपाने त्यांना वाराणसीतून मुरली मनोहर जोशी यांच्या विरोधात उभे केले पण अजय राय यांना या निवडणुकीत दारूण पराभवाला सामोरे जावे लागले.
2012 मध्ये काँग्रेसचा हात धरला Lok Sabha Election Narendra Modi VS Ajay Rai |
अजय राय यांनी 2012 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. यावर्षी त्यांनी पिंद्रा विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक जिंकली. त्यांनी समाजवादी पक्षाचे अखिलेश मिश्रा यांचा 27,883 मतांनी पराभव केला. अजय राय यांना 52,863 हजार मते मिळाली. तर मिश्रा यांना 24,980 मते मिळाली.
मोदींविरुद्ध दोन निवडणुकीत पराभव
2014 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने राय यांना वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात उभे केले पण त्यांना दारुण पराभव पत्करावा लागला. मोदींनी त्यांचा 5 लाखांहून अधिक मतांनी पराभव केला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने मोदींविरोधात अजय राय यांना पुन्हा एकदा वाराणसीतून तिकीट दिले.
यावेळीही त्यांना त्रास सहन करावा लागला. यावेळीही त्यांना 5 लाखांहून अधिक मतांनी पराभव स्वीकारावा लागला. त्याच वेळी, ऑगस्ट 2023 मध्ये काँग्रेसने ब्रिजलाल खबरी यांना हटवले आणि अजय राय यांची उत्तर प्रदेश काँग्रेस म्हणून नियुक्ती केली.
काँग्रेसच्या नव्या यादीत महाराष्ट्रातील चार जणांचा समावेश Lok Sabha Election Narendra Modi VS Ajay Rai |
दरम्यान, काँग्रेसने याआधी महाराष्ट्रातील 8 लोकसभेच्या जागेवर उमेदवारांच्या नावांची घोषणा केली होती. तर काल जाहीर केलेल्या काँग्रेसच्या या यादीत महाराष्ट्रातील 4 मतदारसंघांच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. यामध्ये नागपूरमधून विकास ठाकरे, रामटेकमधून रश्मी बर्वे, भंडारा गोंदियातून प्रशांत पडोळे आणि गडचिरोलीमधून नामदेव किरसान यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
हेही वाचा:
दिल्लीत सरकार तुरुंगातून चालणार…! अरविंद केजरीवाल यांनी ED कोठडीतून दिला पहिला ‘आदेश’