पवनानगर- पवना धरणामध्ये येणारी आवक जास्त असल्यामुळे धरण 86.34 टक्के भरले आहे. त्यामुळे शुक्रवारी (दि.30) सकाळी नऊ वाजतापासून धरणातून विसर्ग वाढविण्यात आला आहे. सांडव्यावरून 3268 क्युसेकने तर हायड्रोद्वारे 1400 क्युसेकने असा एकूण 4668 क्युसेकने विसर्ग करण्यात आला आहे.
दमदार पावसाने पवना धरण 86.34 टक्के भरल्यामुळे धरणातून गुरुवारी सायंकाळी चार वाजल्यापासून 3017 क्युसेकने तर हायड्रोद्वारे सायंकाळी सहा वाजता 1400 क्युसेकने असा एकूण 3017 क्युसेकने धरणातून विसर्ग करण्यात आला होता.