पवनानगर, (वार्ताहर) – पिंपरी चिंचवडसह मावळ तालुक्याचे पाण्याचे मुख्य स्रोत आसलेल्या पवना धरणात यावर्षी आज अखेर ५५.६३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. धरणाची पाणी साठवण क्षमता ८.५१ टीएमसी आहे.
पवना धरणाची पाणी पातळी १९९४.३० फूट असून सध्या पवना धरणात ४७३६ दशलक्ष घनफुट इतका उपयुक्त साठा आहे. तर मागिल वर्षी आज आखेर ५५.८२ टक्के पाणी साठा शिल्लक होता. मागील वर्षी चांगला पाऊस झाल्याने ऑगस्टमध्येच पवना धरण शंभर टक्के भरले होते. , अशी माहिती पवना पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आली.