पुणे – शारीरिक शिक्षण संचालकास दुचाकीवरील चार जणांनी दगडाने मारहाण केली. ही घटना औंध येथील डॉ.बाबसाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या गेटवर घडली. याप्रकरणी चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी भिमराव शिवाजीराव पाटील (58,रा.आंबेगाव बुद्रुक) हे शारीरिक शिक्षण संचालक पदावर काम करतात. ते सायंकाळी महाविद्यालयाच्या गेटवर उभे असताना त्यांनी चार अनोळखी व्यक्तींना गेटजवळ थांबू नका असे सांगितले. मात्र जाताना ते फिर्यादीला धमकी देऊन गेले. दोन ते तीन मिनिटांतच ते तेथे दोन दुचाकीवरुन परत आहे. यानंतर फिर्यादीला हाताने व दगडाने मारुन जखमी केले. तेथे उपस्थित असलेल्या शिक्षक डॉ.बंडोपंत कांबळे यांनाही दगड मारुन जखमी केले. याप्रकरणाचा तपास पोलीस हवालदार पवार करत आहेत.