पिंपरी -शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (स्कॉलरशिप) परीक्षेमध्ये निगडी येथील माता अमृतामय विद्यालयातील इयत्ता आठवीतील दिशा बबन पवार विद्यार्थ्यांनीने नेत्रदीपक यश मिळवत याही वर्षी हवेली तालुक्यातील मेरिट लिस्टमध्ये सहावा नंबर मिळविला आहे.
इच्छाशक्ती प्रबळ असेल तर या जगात कोणतीही गोष्ट अशक्य नसते. ऑनलाइन क्लास करत दिशा पवार हिने पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा दिली. एकूण 300 पैकी 255 गुण मिळवून पुणे जिल्ह्यात 36 वा तर हवेली तालुक्यात सहावा नंबर मिळाला आहे.
विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रमाचे व कष्टाचे चीज झाल्याचे वर्ग शिक्षक यांनी समाधान व्यक्त केले. भावी काळात विद्यालयातील अनेक विद्यार्थी उच्चपदस्थ अधिकारी होतील आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करून आपला, आपल्या पालकांचा आणि विद्यालयाचा नावलौकिक वाढवतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
यादीमध्ये सई मुळ्ये (85.90), श्रेया भिसे (85.90), सोहम चिंचोळकर (85.33), दिशा पवार (85.23), सशा बोंगळे (85.23), प्रद्युम्न शिंदे (84.66), श्रेया दीक्षित (84.66), पार्थ लोखंडे (84.66), अथर्व फालके (84.66), आभा वाळूंज (84.66), शंतनू नरुळे (84.56), सायली पांडे (84.56), पार्थ बोबडे (84.56), विवेक जगतपा (84), सार्थक गजरे (84), कृतिका सराटे (84), ओमकार नरके (84), वेदिका गोबरे (84), प्रणव निकम (83.33), श्रेयसी लकरे (83.22), अदित्य पिंपळे (83.22), प्रतीक चव्हाण (82.66), वेदांत पोखरकर (82.66), मोहीत पाठक (82.55), वेदांत धांदरे (82).