पुणे : राज्याच्या विधानसभेचे माजी अध्यक्ष तब्बल 66.81 टक्के मते मिळवत आघाडीवर आहेत. त्यांना 48 हजार 908 मते मिळाली. त्यांच्या विरोधात भाजपाचे राजाराम बाणखेले यांना 22 हजार 74 मते मिळाली. राज्याचे उच्च शिक्षण, तंत्रज्ञान, उर्जा आणि अर्थ अशी महत्वाची खाती भूषवलेल्या वळसे पाटील यांचे या मतदारसंघावर प्रभुत्व आहे. शिरूर लोकसभा मतदार संघातून शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव झाल्यानंतर या मतदार संघातील लढतीविषयी औत्सुक्य निर्माण झाले होते.