पिंपरी -श्रीमन महासाधू श्री मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवात गुरुवारी (दि.23) ध्रूपद गायनाचा बहारदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये चिंतामणी नातू यांनी राग मुलतानीमध्ये आलाप जोड आणि चौतालामध्ये पिनाक धर बन्सीधर ही बंदिश सादर केली.
तर सुल तालामध्ये राजत शिवशंकर या दोन बंदिशी गायल्या. तसेच गुरु. पं. उदय भवाळकर यांनी स्वरबद्ध केलेली शिवरंजनी रागातील शिवपंचाक्षरी स्तोत्र रचनेस रसिकांची उस्फूर्त दाद मिळाली. या प्रसंगी पखवाजावर शिवनारायण काशीद यांची साथ लाभली. मोरया गोसावी समाधी सोहळा सुरू असून, येत्या शनिवारी (दि.25) त्याची सांगता होणार आहे.