पिंपरी -पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज तब्बल सात ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामध्ये 4 पुरुष, 2 महिला व एका लहान मुलीचा समावेश आहे. त्यामुळे शहरातील ओमायक्रॉनची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 19 झाली आहे.
परदेशातून आलेले प्रवासी व त्यांच्या सहवासातील 1325 नागरिकांची आतापर्यंत तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 1147 जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये परदेशातून आलेल्या 27 जणांना करोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. तर त्याच 27 रुग्णांपैकी 10 जणांना ओमायक्रॉनची बाधा झालेली होती. त्यांच्या संपर्कातील नागरिकांची तपासणी केली असता त्यापैकी 9 जणांना ओमायक्रॉनची लागण झाली असल्याचे समोर आले आहे.
सात रुग्णांना ओमायक्रॉन या व्हेरियंटची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये चार पुरुष, दोन महिला व एका लहान मुलीचा समावेश आहे. नवीन भोसरी रुग्णालयामध्ये 4 तर उर्वरित 3 रुग्ण खासगी रुग्णालयामध्ये दाखल असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
परदेशातून आलेल्या 53 करोनाबाधित रुग्णांची दहा दिवसानंतर पुन्हा करोनाची तपासणी करण्यात आली असून त्यांचा अहवाल नकारात्मक आला आहे. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला असून गृह विलगीकरणात ठेवले असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली. Seven patients with in the city