धोनीला तब्बल 12 लाखांचा दंड

मुंबई  -दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात वेळेत षटके पूर्ण न केल्याबद्दल चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीला तब्बल 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

आयपीएलमध्ये धोनीच्या चेन्नई संघाने दिल्लीसमोर 189 धावांचे आव्हान ठेवले होते. विजयासाठी मैदानात उतरलेल्या दिल्लीच्या फलंदाजांनी आक्रमक प्रारंभ केल्याने धोनीने वारंवार गोलंदाजीत बदल केले. मात्र, त्यामुळे चेन्नईला लाभ होण्याऐवजी तोटाच झाला व वेळेत षटके पूर्ण होऊ शकली नाहीत. बीसीसीआयच्या नव्या नियमानुसार प्रत्येक संघाला खेळण्यासाठी 90 मिनिटांचा अवधी देण्यात आला आहे.

या 90 मिनिटांमध्ये अडीच मिनिटांचे दोन टाइम आउट देण्यात आलेत. म्हणजे 85 मिनिटांमध्ये 20 षटकांचा खेळ अपेक्षित आहे. प्रत्येक तासाला ओव्हर रेट 14.1 असा ठेवला गेला पाहिजे असेही बंधन आहे. या नव्या नियमाचे चेन्नईकडून उल्लंघन झाले. सामन्यात चेन्नईच्या संघाने 18.4 षटके टाकली आणि दिल्लीच्या संघाने 8 चेंडू राखत 189 धावांचं लक्ष्य गाठले.

आयपीएलचे आतापर्यंत केवळ दोन सामने झाले आहेत. दिल्लीने पराभूत केल्याने चेन्नईचा संघ गुणतालिकेत आठव्या स्थानावर फेकला गेला आहे, तर मुंबई सातव्या स्थानावर आहे. दिल्ली कॅपिटल्स पहिल्या स्थानावर आहे, तर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू दुसऱ्या स्थानावर आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.