पुणे – मानाचा तिसरा गणपती गुरूजी तालीम मंडळाची मिरवणूक सुरू झाली असून शितळादेवी मंदिर, गणपती चौक, लक्ष्मीरस्ता, नगरकर तालीम, आप्पा बळवंत चौक, जोगेश्वरी मंदिर, सिटी पोस्ट या मार्गाने मिरवणुकीचे मुख्य मंडपात आगमन झाले. या मिरवणुकीदरम्यान येरवडा कारागृहातील कैद्यांचे ढोल ताशा पथकाने वादन केले आहे.
या ढोल-ताशा पथकात 30 कैद्यांचा समावेश असून नादब्रम्ह ढोल ताशा पथकांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना प्रशिक्षण दिले होते. महिनाभर रोज दोन तास सराव करून त्यांना पाच ते सहा ठेके वाजविण्यास शिकविले. कारागृह प्रमुख सुनील रामानंद यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या पथकाचा आरंभ करण्यात आला.