नवी दिल्ली : भारतातल्या पोलाद क्षेत्रातल्या संधी, पोलादाची वाढती मागणी आणि तंत्रज्ञान व अभिनवता भारतीय पोलाद क्षेत्राला अधिक प्रभावी कसे करू शकतील, असे केंद्रीय पोलादमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले आहे. सीआयआयने नवी दिल्ली येथे आयोजित केलेल्या “स्टीलिंग इंडिया-2019:ड्रायव्हिंग मेटल इन्टेन्सिटी इन की सेक्टर्स’ या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी प्रधान बोलत होते.
देशातल्या नागरिकांच्या आकांक्षा वाढत असून खरेदी करण्याची क्षमता वाढत आहे. भारत ही वाढती बाजारपेठ असून देशांतर्गत उद्योगाला विस्ताराच्या अमाप संधी आहेत. जागतिक तुलनेत आपले दरडोई पोलाद उपभोगाचे प्रमाण बरेच कमी आहे. पोलादाचा उचित वापर वाढवण्यासाठी “इस्पाती इरादा’ ही संयुक्त मोहीम सुरू केल्याचे प्रधान यांनी सांगितले.
पोलादाच्या वाढत्या मागणीत ग्रामीण भारत महत्वाची भूमिका बजावेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पोलाद क्षेत्राच्या विकासासाठी सरकारने उचललेल्या पावलांची माहिती प्रधान यांनी दिली.